महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत महिलांनी तक्रारी मांडाव्यात :- रूपाली चाकणकर उद्या कोल्हापुर जिल्ह्यात,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यांतील तक्रारीची जनसुनावणी शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पोटोळे तक्रारीची सुनावणी घेणार आहेत, जिल्ह्यांत होणाऱ्या या जन सुनावणीत महिलांनी पुढे येवुन न घाबरता तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी केले आहे, दिनांक. 20 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत, महिलांनी त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी महिला आयोगाकडूंन महिला आयोग आपल्या दारी, हा उपक्रम राबविण्यात येत आहे, यामध्ये जिल्हा स्तरांवर निवारण करण्याचा प्रयत्न आहे सुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.


