सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन आज मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सातारा प्रतिनिधी : शंकर माने
सातारा येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करून या ठिकाणी नवीन विश्रामगृह बांधण्यात आले आहे. यासाठी १३ कोटी १२ लाख ७६ हजार १९४ रुपये खर्च आला आहे. यामध्ये मल्टिपर्पज हॉल, ५ साधारण कक्ष, डायनिंग व किचन, स्वागत व प्रतीक्षा कक्ष, एव्ही रुम, पैंट्री, स्टोअर रूम, १ व्हीव्हीआयपी सुट, २ व्हीआयपी सुट, कॉन्फरन्स रूमसह आकर्षक विद्युत रचना, प्रोजेक्टर, ऑडियो-व्हिडिओ सिस्टीम यांसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सातारा शहरात ही देखणी वास्तू अद्ययावत व आवश्यक सोयी-सुविधांसह उभी राहिली, याचा आनंद असल्याची भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा. महेशजी शिंदे, आमदार मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. जयकुमारजी गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, तसेच स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.


