दिवळे येथे महसूल दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न! वनविभाग व महसूल विभागाच्या संयुक्त उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगेश पवार
दि. 3 कापूरहोळ :- महसूल दिनानिमित्त महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी दिवळे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास संगमनेरचे मंडलाधिकारी ढवळे भाऊसाहेब, कापूरहोळ येथील तलाठी धम्मदीप शिखरे भाऊसाहेब, भोलावडे येथील तलाठी भडके मॅडम, रिपब्लिकन सेनेचे भोर तालुका विधानसभा अध्यक्ष किशोर अमोलिक, दिवळे गावच्या सरपंच विद्याताई पांगारे, भाजप भोर तालुका उपाध्यक्ष सुनील पांगारे, भाजप उपाध्यक्ष गणपत पांगारे, पोलीस पाटील प्रसाद पांगारे तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी वनविभाग व महसूल विभागातर्फे विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.
या उपक्रमाबद्दल प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजय कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व अभिनंदन करून कार्यक्रमाचे कौतुक केले.


