प्रांत डॉ. विकास खरात व तहसीलदार नजन यांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार – रस्ते मोकळे, हरित भोर


संपादक : मंगेश पवार

दि.3  सारोळे :-भोर तालुक्यात महसूल व वन विभाग सप्ताह (१ ते ७ ऑगस्ट) साजरा करताना प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून विकासाचे प्रत्यंतर दिले. भोंगवली गावात वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला आणि अनेक वर्षांपासून बंद असलेले भोर तालुक्यातील १०० हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले. त्यांनी रस्त्याच्या अडचणी प्रत्यक्ष पाहून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तात्काळ निर्णय घेऊन बंद रस्ते वाहतुकीसाठी खुल्या केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला.

कार्यक्रमावेळी भोंगवली गावचे शेतकरी, ग्रामस्थ तसेच सर्कल लहारे, तलाठी हेमंत पाटील, महसूल सेवक बाबा भंडलकर उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपली अडचण ऐकून घेऊन त्यावर त्वरीत उपाय केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.

या उल्लेखनीय कार्यासाठी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

 

“शेतकरी वर्गासाठी प्रांताधिकारी – डॉ. विकास खरात”

ADVERTISEMENT

भोर तालुक्यात रस्ते सुरू, वृक्षारोपणही – महसूल सप्ताहात लोकाभिमुख कृती ,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा निर्णयक्षम अधिकारी अशी डॉ. विकास खरात यांची तालुक्यात ओळख झाली आहे.त्यांच्या पुढाकाराने १०० हून अधिक बंद रस्ते खुल्या करण्यात आले, जे शेतमाल वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

महसूल सप्ताहात वृक्षारोपण, रस्ता सुरूवात, व प्रत्यक्ष अडचणींवर उपाययोजना या गोष्टींनी त्यांच्या कामगिरीची वेगळी छाप सोडली.

पारदर्शक व तत्पर प्रशासनाची उदाहरणार्थ भूमिका त्यांनी भोर तालुक्यात पार पाडली असून, शेतकरी त्यांना “आपला अधिकारी” मानत आहेत.

 

 

 

 कर्तव्यदक्ष तहसीलदारराजेंद्र नजन यांचे भोरमध्ये भरीव योगदान

भोर तालुक्यातील महसूल व्यवस्था सशक्त करण्यासाठी तहसीलदार राजेंद्र नजन यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याचा धडका निर्णय त्यांनी घेतला असून, प्रत्यक्ष उपस्थित राहून रस्त्यांचे काम मार्गी लावले.

वनविभाग व महसूल विभाग यांच्यात समन्वय साधत झाडारोपणासही चालना दिली.

त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, स्पष्टता आणि लोकाभिमुखता जाणवते, जे तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत सकारात्मक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!