कार्यसम्राट आ. संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत माळवाडी गावातील ग्रामस्थांचा जाहीर काँग्रेस प्रवेश.
भोर : आमदार मा.संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावीत होऊन भोर तालुक्यातील मौजे म्हाळवडी येथील नथू गेणू बोडके(महाराज), निवृत्ती आबाजी बोडके, मोहन कोंडीबा बोडके, गणपत शंकर गायकवाड, दिगंबर गेनबा बोडके, दत्तात्रय पांडुरंग बोडके, दत्तात्रय तुकाराम बोडके, मारुती भगवान मोकाशी, तुकाराम बबन बोडके, अमोल शिवाजी बोडके, अनिल शिवाजी बोडके, नामदेव राघू बोडके, संदीप सुदाम बोडके, विठ्ठल दत्तू बोडके, यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी संग्राम थोपटे यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, काळुराम माळेकर, भाऊ मळेकर, अनंता दूरकर, दिपक कुमकर, माऊली दानवले, उदयकांत मोकाशी, आण्णा बबन बोडके, महेश पर्वती बोडके यांच्यासह म्हाळवडी ग्रामस्थ तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


