“नागपूर आंदोलनात भोर तालुक्याची भव्य उपस्थिती — प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्षांचे आवाहन”
मंगेश पवार
भोर :-प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ व मच्छिमार बांधवांच्या न्याय हक्कांसाठी नागपूर येथे २८ ऑक्टोबर २०२५ पासून सलग ६ ते ७ दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांची अनिवार्य उपस्थिती बंधनकारक असून, प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रातून कार्यकर्त्यांना घेऊन यायचे आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बच्चू कडू यांनी आदेश दिले आहेत.
अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, अशीही सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी हे आंदोलन निर्णायक व क्रांतिकारी ठरणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
भोर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात भोर तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी.प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातून कार्यकर्ते घेऊन आंदोलनात सहभागी होणे गरजेचे असून, भोर तालुक्याची ताकद या आंदोलनात दिसेल.
अजय कांबळे अध्यक्ष भोर प्रहार जनशक्ती पक्ष