किकवी विद्यालयात नवरात्रौत्सवानिमित्त भोंडल्याचा उत्साही कार्यक्रम


मंगेश पवार

दि. 30 सारोळे :– किकवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक भोंडला, दांडिया व गरबा या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपरिक पोषाख परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

 

कार्यक्रमाला किकवी शिक्षण संस्थेचे सहसचिव ईश्वर भिलारे, निलेश लाळे, अभिमन्यू कोंढाळकर, अक्षय अहिरे व हर्षद जाधव उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

ADVERTISEMENT

 

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी उपशिक्षिका संजीवनी सुतार, संगीता राऊत, स्वाती दळवी व दिप्ती वीर यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थिनींना भोंडला व पारंपरिक खेळांबाबत माहिती दिली.

 

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नवरात्र उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व व परंपरा यांची ओळख करून देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांसाठी आकर्षक दांडिया, गरबा यासह स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेवटी सहसचिव ईश्वर भिलारे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, तर मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!