“सारोळे–गुणंद खड्डे संकट: बैठक झाली, उपाय नाही;वरिष्ठ अधिकाऱ्यांच ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष ” ”
दि. 30 भोर :- सारोळे ते गुणंद या अतिशय खराब झालेल्या रस्त्याबाबत वरिष्ठ अभियंता अनुराधा भंडारी यांनी भोर तालुक्यातील गेस्ट हाऊस येथे कृती समिती तसेच ग्रामस्थ यांच्यासोबत विशेष चर्चा आयोजित केली होती.
या बैठकीस कृती समिती अध्यक्ष संतोष बोबडे,उपाध्यक्ष शुभम शेटे, भालचंद्र जगताप संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, अक्षय सोनवणे आरोग्यसेवक,अजय कांबळे,सरपंच तेजस साळुंखे,मा.सरपंच अरुण पवार, संतोष बोबडे, बाळासाहेब खुटवड, निलेश भांडे, राजू काका सोनवणे, मिलिंद तारू,ओंकार महांगरे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी हल्लाळे आणि आगळे यांनीही हजेरी लावली होती. चर्चेदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ३ ऑक्टोबरपासून तात्पुरती डागडुजी सुरू करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच पक्का रस्ता करण्यासाठी निधी मिळवण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
मात्र या चर्चेत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी मांडल्या तरी वरिष्ठ अधिकारी भंडारी यांनी त्यावर योग्य निवारण केले नाही, अशी भावना कृती समितीमध्ये व्यक्त झाली. तालुक्यात रस्त्यांच्या असंख्य समस्या असताना अधिकारी वेळ न देणे व तक्रारींकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असल्याचे मत कृती समितीचे उपाअध्यक्ष शुभम शेटे यांनी मांडले.
सारोळे ते गुणंद रस्त्यांच्या बिकट अवस्थेबाबत वरिष्ठ अधिकारी अनुराधा भंडारी यांनी आज कृती समिती व ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा करायची होती. मात्र, वेळ दिल्यानंतरही त्यांनी कृती समिती यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या नाहीत. ग्रामस्थांनी तक्रारींसह उपस्थिती लावली तरीही त्यांचे निवारण झाले नाही.अधिकारी वर्गाकडून तालुक्याच्या रस्ता स्थितीचा अहवाल घेऊन ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.“जबाबदारी असूनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करतोय, त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.” पुढील दिवसात रस्ता व्यवस्थित नाही झाल्यास शिवप्रहार प्रतिष्ठान पुणे येथील मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग 1 कार्यालयासमोर आंदोलन करणार.
संतोष मोहिते अध्यक्ष शिवप्रहार प्रतिष्ठान