स्मशानभूमीतील लाकडावरून वालचंदनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा आणला उघडकीस, वालचंदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या,
संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
कानून के हात लंबे है… याचा अनुभव पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला आहे, वालचंदनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमधील तावशी (ता.इंदापूर ) येथील स्मशानभूमी मध्ये जळालेल्या आज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास लाकडावरून व हाडाच्या राखेवरून तपास लावून खून करणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका चित्रपटातील प्रसंगप्रमाणे खून प्रकरणाचा तपास लावल्याने ग्रामस्थांतून पोलिसांचे विशेष कौतुक आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय 30) विशाल सदाशिव खिलारे (वय 23) रा. दोघेही गोखळी ता. फलटण जि.सातारा) यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी हरिभाऊ धुराजी जगताप (वय 74) रा. गंगाखेड जिल्हा परभणी या व्यक्तीचा खून केला होता. हरिभाऊ जगताप यांचा खून हा पत्नीची छेड काढण्याच्या कारणांतून केला होता. हरिभाऊ जगताप व दादासाहेब हरिहर हे एकमेकांचे ओळखीचे नोव्हेंबर रोजी दादासाहेब हरिहर हा जगताप यांच्या गंगाखेड येथील घरी गेल्यानंतर जगताप यांनी हरिहर यांच्या पत्नीची छेड काढली होती. याचा राग मनामध्ये धरून जगताप याला जीवे मारण्याचा कट रचला होता. या खुनांच्या तपासाचं वालचंदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे मोठा प्रश्नचिन्ह होता..? (वालचंदनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे यांचे अभिनंदन) यावेळी आदरणीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की निवडणुकीच्या कामामध्ये पोलीस व्यस्त होते. मात्र वालचंदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निवडणुकीच्या काळामध्ये खुनाचे मोठे चॅलेंज स्वीकारून कुठलाही पुरावा व धागेद्वारे नसतानाही एक खून प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केले,


