नसरापुर येथे मेडिकल ऑफिसर डॉ.मंदार माळी यांनी केली सुखरूप प्रसूती…


 

पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज

कार्यकारी संपादक:सागर खुडे

 

काल सायंकाळीचे सुमारास (२४नोव्हें) नसरापूर माळेगाव येथील डिलिव्हरी प्रसूतीपूर्वी महिलेच्या अंगावरून जाण्याच्या आलेल्या एमर्जंसी कॉल नंतर बीव्हीजी १०८ॲम्बुलन्स वरील मेडिकल ऑफिसर डॉ.मंदार माळी यांनी सहपालट विशाल कदम यांच्या साहाय्याने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेची प्रसूती अतिशय काळजीपूर्वकरीत्या सुखरूप केली. थोड्क्यात डॉ.माळी यांचं काम म्हणजे

“जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती…!”

“देह कष्टविधी परोपकारी….!”

ADVERTISEMENT

अगदी या उक्ती प्रमाणे गोरगरीब गरजू लोकांना अतिशय माफक स्वरूपात काळजीपूर्वकरित्या आणि तितक्याच जबाबदारीने आरोग्य सेवा प्रदान करतात अशी त्यांची ओळख.१०८अँब्युलन्स इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून डॉ. मंदार माळी भोर,वेल्हे(राजगड) तालुक्यासह किकवी नजिकचा परिसर तसेच खेडशिवापूर अशा सर्व भागामध्ये तत्परतेने जात उचित आरोग्य सेवा प्रदान करण्याचे अखंडपणे काम करीत असल्याने बीव्हीजी १०८ झोनल मॅनेजर डॉ.विट्ठल बोडके तसेच डिस्ट्रिक्ट मॅनेजर प्रियंका जावळे तसेच एडीएम सुजित पाटील यांचे देखील नातेवाईकांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!