फलटण कोरेगांव मतदार संघातून सचिन पाटील विजयी, तर दीपक चव्हाणांचा पराभव,


 

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी .

ADVERTISEMENT

फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघाकडे निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळ्यांच्या नजरा लागून होत्या, या मतदार संघात राष्ट्रवादी अजित गटाने मोठी ताकद लावली होती. नुकत्याच झालेल्या माढा लोकसभा निवडणुकीत फलटण मध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील व भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती, मात्र विधानसभेला सचिन पाटील यांनी 17046 मतांनी आघाडी घेवुन विजय मिळवला आहे, मात्र यावेळी फलटण विधानसभेला महायुतीच्या माध्यमांतून वेगळी फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या विरोधांत महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे-पाटील यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती, अखेर फलटण कोरेगांव मतदार संघातून नवा चेहरा समोर आला आहे, लाडक्या बहिणींमुळे सध्या महायुतीचे सरकार आल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे,*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!