आमदार संग्राम थोपटे अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टवतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेला भोर शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


 

दि.१३ भोर : अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, भोर,राजगड (वेल्हा) मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर शहरात आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा, व यानिमित्ताने महिलांसाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रम भोरेश्वर मंगल कार्यालय, पिराचा मळा येथे संपन्न झाला.

अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या आयोजनातून भोर, राजगड, मुळशी तसेच भोर शहरातील महिला भगिनींसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक तालुका निहाय या कार्यकमाचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे, तसेच भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. भोरेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी भोर शहरातील महिला उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभागी घेऊन खेळाचा आंनद घेतला.

यावेळी गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिला स्पर्धकांना सोफा सेट, कपाट, पिठाची गिरणी, वॉटर फिल्टर, फूड प्रोसिसर त्याचप्रमाणे होम मिनिस्टर खेळातील विजेत्या स्पर्धकांना टीव्हीएस ज्युपिटर, फ्रिज, एलईडी टीव्ही, मायक्रोओव्हन, वॉशिंग मशीन, लकी ड्रॉ पद्धतीने पाच मोबाईल फोन, पाच कुकर, पाच मिक्सर, पाच स्मार्ट वॉच बक्षीसे देण्यात आली. यामध्ये भोर शहरातील साधारणता अडीच ते तीन हजार महिलांनी सहभाग नोंदविल्याचे कार्यक्रमाचे आयोजक सौ.स्वरूपा थोपटे यांनी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी भोर राजगड (वेल्हा) मुळशी मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे, आयोजक सौ.स्वरूपा थोपटे, यांच्यासह राजगड ज्ञानपीठचे विश्वस्त पृथ्वीराज थोपटे, भोर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गीतांजली शेटे, भोर शहराच्या मा.नगराध्यक्षा निर्मला आवारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पुणे जिल्हा युवती अध्यक्षा दुर्गा चोरघे, भोर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता भेलके, यांच्यासह भोर शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आजी माजी पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, महिला, माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

 

होम मिनिस्टर स्पर्धा विजेत्या

1) निलम निलेश पवार

2) सुनीता निरंजन देशमुख

3) सेजल दिपक धोत्रे

4) सुरेखा मारुती मोरे

5) रुपाली संजय तांबे

 

गौरी गणपती सजावट स्पर्धा विजेत्या

1. रजनी पांडुरंग तांबे

2. दिपाली जगदीश तारू

3. आरती हनुमंत गाडेकर

4. मोनिका अमोल पवार

5. वंदना सुदाम भेलके


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!