परिस्थितींने घडवलं आणि राजश्री पाटील-तेरणी बनल्या ( डीवायएसपी ) त्यांच्या यशाची कहाणी; रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन शुभेच्छा…!!


संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी. नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील-तेरणी या कोल्हापूर जिल्ह्यातील हिंटणी गावातील सर्व सामान्य कुटुंबातील कन्या आहेत. त्यांनी आपल्या आर्थिंक परिस्थितीला अजिबात बाऊ न करता श्रमप्रतिष्ठा या गोष्टीला प्रथम प्रधान्य देणाऱ्या या कुटुंबाने स्पर्धा परीक्षा इच्छुकांपुढे श्रमप्रतिष्ठा,संयम सातत्य कष्ट याचे एक सुंदर उदाहरण ठेवले ती मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हिंटणी या गावातील आहेत. त्यांचे वडील एका हॉटेलमध्ये काम करत होते. तर आई शिवणकाम करीत होत्या असे असले तरी मुलीने उच्च शिक्षित व्हावे आणि आपले नाव कमवावे असे त्यांना नेहमीच वाटतं होते. आपल्या घरची आर्थिंक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी बारावीनंतर लवकर नोकरी मिळेल म्हणून डी.एड केले पण त्यानंतर शिक्षक भरती बंद झाली शिक्षक होऊन लवकर नोकरी मिळवण्याचं स्वप्न त्यांचे अपूर्णच राहिले होते. आता काय करावे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. पण पदवी तर पूर्ण करूयात या उद्देशाने त्यांनी बी. एससी ला प्रवेश घेतला. प्रथम वर्षात असताना त्यांचे लग्न झाले मात्र सासर आणि माहेर या दोन्हीकडचं त्यांना चांगलंच प्रोत्साहन होतं. नोकरीची गरज म्हणून पावलं एमपीएससीकडे वळली. त्यांनी संसाराचा गाडा संभाळत हा अभ्यास पूर्णता: केला. आणि जिथे शिक्षक व्हायची इच्छा त्याच क्षेत्रातही उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली हे पद मिळाल्यावर मी पहिल्याच पगारांत त्यांनी सर्वप्रथम आई-वडिलांची मेहनत कमी करणे बंद केले होते. आणि खरंच आई-वडिलांच्या स्वप्नाला त्यांनी चांगलीच गवासणी घातली. आखेर त्यांनी खाकी वर्दींला प्रधान्य दिले, परीक्षेला बसल्या स्वतःचे कष्ट आणि सासर माहेरकडील या सर्वांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्या सन 2024 मध्ये त्या पोलीस उपअधीक्षक म्हणजे ( डी वाय एस पी ) पद त्यांना मिळाले आहे. अशा या नवनियुक्त आदरणीय पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील-तेरणी मॅडम यांना आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन पुढील सेवेसाठी शुभेच्छा आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!