लोणंदचा भैरवनाथ डोंगर ग्रुप भर पाऊसातही करतोय पर्यावरणाचे संगोपन.
संपादक: दिलीप वाघमारे
लोणंद :- डोंगरावर लावलीत 200 पेक्षा जास्त वड , पिंप , लिंब , करंज , चिंचेची झाडे
गेली आठ वर्ष कॅन मध्ये पाणी नेऊन जगवली आहेत झाडे
भर पाऊसात नवीन झाडासाठी खणले जातायत खड्डे
डोंगरावर धुक्याच्या दुलयीचा घेतायत डोंगर ग्रुपचे सदस्य आनंद
लोणंदचा भैरवनाथ डोंगर ग्रुप भर पाऊसातही करतोय पर्यावरणाचे संगोपन
लोणंद ( प्रतिनिधी ) – लोणंद व डोंगर परिसरधुक्याच्या दुलईत लपेटून जाऊन धुक्याने पांढरी चादर निर्माण केली होती . अशा रिम झिम पाऊसातही भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य वृक्षारोपन करून पर्यावरणाचे संगोपन करतायत .
गेल्या चार दिवसा पासून संपूर्ण लोणंद नगरीसह परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे .तर अधून मधून मोठ्या सरी कोसळत आहेत अशातच भैरवनाथ डोंगर धुक्यात हरऊन जात आहे . त्यामुळे भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य निर्सगाचा सुंदर नजारा पहात आनंद घेत आहेत .
डोंगर गुपचे सदस्य भर पावसामध्ये नवीन वृक्षारोपणासाठी खड्डे खणत आहेत तर समतल चरही खोल करून मुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत डोंगर ग्रुप गेली आठ वर्षापासून डोंगरावर वृक्ष लागवड करून त्याचे यशस्वीपणे संगोपन करीत आहे .
सध्या सुरू असलेल्या उन्हाळी पावसाने वातावरण गारीगार झाले आहे याचाच फायदा घेत डोंगरावर नवीन झाडांसाठी दोन ते तीन फुट खोल खड्डे श्रमदान करून घेत आहोत .
डोंगर ग्रुपच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे .
याबाबत माहिती देताना डोंगर ग्रुपचे क्रियाशील सदस्य हेमंत निंबाळकर म्हणाले ,