पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, न्हावी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


मंगेश पवार

सारोळे :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, न्हावी हायस्कूल येथील 2006-07 च्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 18 वर्षांनंतर एकत्र आले. या गेट-टुगेदरमध्ये 45 माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, शाळेला CCTV बसवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गेल्या काळात निधन पावलेल्या शिक्षक व सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थी सुनिल भोसले, संग्राम गरुड, महेश शिंदे,शिवाजी सोनवणे, नितीन सोनवणे, अभिजित सोनवणे, अजित सोनवणे, राजेंद्र टापरे, माधुरी वणवे, दीपाली वनवे यांनी आपल्या मनोगतांमधून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. तर चेतन सोनवणे यांनी आपली कला सादर करत त्याचें गुरु म्हणजे वालगुडे सर यांचे सुंदर शिल्प तयार केले.

ADVERTISEMENT

 

शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शाळेसाठी सकारात्मक योगदानाची भावना व्यक्त केली. जी.प. प्रा. शाळा, न्हावी येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाचर दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील उपस्थित शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोबळे सर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचे एकजुटीने शाळेसाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवणीची भेटवस्तू देण्यात आली.

 

कार्यक्रमाचे नियोजन: किशोर बोन्द्रे, चेतन सोनवणे, रणजित सोनवणे, नितीन सोनवणे, सुनिल भोसले संग्राम गरुड,शिवाजी सोनवणे, अभिजित सोनवणे, नवनाथ बोन्द्रे यांनी केले.

सूत्रसंचालन: मोनाली सोनवणे व अजित सोनवणे यांनी केले.

आभार प्रदर्शन:-सुनिल भोसले यांनी मानले.

 

हा स्नेहमेळावा केवळ माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचा सोहळा न ठरता,शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा एक सुंदर समूहप्रयत्न ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!