आर्थिक फसवणूक उघडकीस येऊनही तसेच वारंवार तक्रार अर्ज देवूनही महिलांना न्याय मिळत नसल्याने आर्थिक जाचाला कंटाळलेल्या महिलांसह तरुण करणार थेट दिल्लीला सामुहिक आत्मदहन.


संपादक : दिलीप वाघमारे

अजित मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी सासवड स्थित बँकेकडून गोरगरीब महिलांना आर्थिक आमिष दाखवत महिला बचतगट माध्यमातून पंधरा ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज वितरीत केले होते. मात्र यामध्ये काही महिलांनी आपले कर्ज वेळोवेळी संबंधित बँकेच्या नियुक्त बचतगट प्रतिनिधी यांचेकडे व्याज व मुद्दलसहित नमूद विहित कालावधीत परतफेड केले आहे. सदर कर्ज उपलब्ध करून देतेवेळी महिलांकडून त्यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, कोरे धनादेश,कोरे १०० रु स्टॅम्पपेपर, कोऱ्या विड्रॉल पावत्यांवर सह्या घेत कर्ज मंजूर करून दिले आहेत. तद्नंतर सर्व कर्जदार महिलांनी सदर बँकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या वसुली एजंट्स यांस दरमहा कर्जाचे व्याज व मुद्दल हप्तेस्वरूपात वेळोवेळी भरून महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडून घेतलेले सर्व कर्ज निर्गमित केले आहे.निर्गमित कर्जाचे पुरावे म्हणून कर्ज निर्गमित दाखले देखील काहींना देण्यात आले आहेत. मात्र ज्यांस कर्ज निर्गमित दाखले देण्यात आले नाहीत अशा महिलांच्या वर नमूद बँकेचे तत्कालीन अजित मल्टिस्टेट को ऑप क्रे सोसायटी सासवड संचालक अशोक टेकवडे व सर्व संचालक मंडळ सासवड, शाखा लोणंद,खंडाळा,साखरवाडी शाखाधिकारी व अधिकारी कर्मचारी सह दीपक सस्ते, शब्बीर मुलाणी, किरण डोंबाळे, वैभव जगताप,नईम मेटकरी व इतर त्यांचे सहकारी व खाजगी एजंट यांनी सर्व महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत नव्याने कर्ज प्रकरण मंजूर करून कर्जाची रक्कम परस्पर स्वतःच्या, पत्नीच्या व आपल्या इतर नातेवाईकांच्या आर्थिक हितासाठी वापरली आहे.

 

याबाबत स्वतः अजित मल्टिस्टेट को ऑप क्रे सोसायटी सासवड तत्कालीन संचालक अशोक टेकवडे यांनी त्यांचेच काही प्रतिनिधी यांचेकडून स्वतःच्या बँकेची व महिलांची आर्थिक लुट व फसवणूक करत महिलांकडून गोळा करण्यात आलेले सर्व हप्त्याचे पैसे या पर्तिनिधी यांचेकडून परस्पर हडपले आहेत, तरी देखील त्यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न करता उलट महिलांवरच आरेरावी करत सदरची रक्कम पुन्हा नव्याने वसूल करण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे.

ADVERTISEMENT

 

महिलांची परस्पर हडपलेली रक्कम महिलांनाच भरणेसाठी सक्तीचे आदेश पारित करत या महिलांच्या थकीत कर्जाबाबत कालांतराने सातबारा सदरी लाखो रुपयांचा बोजा चढवण्यात आला ,विविध बँकांची खाती गोठवण्यात आली, तसेच विविध मे न्यायालयातून नोटिसा,समन्स बजावण्यात आले तेव्हा या महिलांना आपली आर्थिक फसवणूक झालेची बाब लक्षात आल्याने त्यांनी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष श्री यशवंत उर्फ गणेश दणाने यांस भेटून घडलेला प्रकार त्यांच्या कानी घातला असता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख सह फलटण ग्रामीण पोलीस ठाणे तसेच लोणंद पोलीस ठाणे मध्ये रीतसर शेकडो तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

 

बँकेचा कारभार दिल्लीवरून चालत असल्याने तसेच संबंधित अजित मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी सासवड मुख्यालयाचे संचालक अशोक टेकवडे हे आपल्याकडील आर्थिक, राजकीय बळाचा वापर करत सर्व शासकीय यंत्रणांना आपल्या आर्थिक दबावाखाली ठेवत असल्याने या पीडित महिलांना अद्याप न्याय मिळत नसल्याने तसेच बँकेच्या येणाऱ्या वारंवार नोटीसा, धमक्या व जाचाला कंटाळून रडत व पश्चाताप करत बसण्यापेक्षा थेट आपले आयुष्याच पणाला लावण्याचा विचार व या बँकेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखांची चौकशी व्हावी व आपल्यासारख्या इतर महिलांची आर्थिक पिळवणूक थांबावी हा विचार सर्व महिलांनी केला असून न्याय मिळावायचाच या मुद्द्यांवर ठाम राहत महिलांनी थेट आता नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात ०४ मार्च २०२५ रोजी आत्मदहन करणेबाबत ठाम विचारचं केला असून आता दिल्लीत काय गोंधळ उडणार हे पाहणे गरजेचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!