श्री सेवा सहयोग फाउंडेशन निर्मित शौचालय युनिट नूतनीकरण प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न…
कार्यकारी संपादक: सागर खुडे
किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवीमध्ये श्री सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी शौचालय इमारत दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले.त्यांतर्फे सुसज्ज असे शौचालय युनिट विद्यालयांमध्ये तयार करण्यात आले. या इमारतीचा उद्घाटन समारंभ बुधवार २७नोव्हेंबर २०२४रोजी दुपारी १२वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आला.
याप्रसंगीचे कार्यक्रमास श्री सेवा सहयोग फाऊंडेशनचे श्री टी. के .गायकवाड सर, सौ. शोभा गायकवाड मॅडम , श्री माधव जोशी सर, सौ मंजू जोशी मॅडम, श्री स्वप्निल पांगारे व किकवी ग्रामपंचायतचे सरपंच श्री नवनाथ कदम, उपसरपंच सौ वंदना अहिरे, मा. ग्रा. सदस्य सौ. राजश्री अहिरे तसेच रचना संस्थेच्या कार्यकर्त्या हजर होते. यावेळी विद्यालयाचे वतीने मुख्याध्यापक श्री विनोद राऊत सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले सरपंच श्री नवनाथ कदम व सर्व पाहुण्यांच्या हस्ते नवीन नूतनीकरण झालेल्या शौचालय इमारतीचे फीत कापून उदघाटन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.किकवी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री दत्तात्रय भिलारे व उपाध्यक्ष श्री प्रशांत कोंढाळकर व सर्व संचालक मंडळ यांनी श्री सेवा सहयोग फाउंडेशनचे आभार मानले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गायकवाड सर व श्री माधव जोशी सर यांनी पुढील काळात विद्यालयास विद्यार्थी गुणवत्ता तसेच प्रगती करता शालेय साहित्य तसेच भौतिक सुविधासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले. सरपंच श्री नवनाथ कदम यांनी या कामाकरिता विशेष सहकार्य केले. उपस्थित पाहुण्यांनी मिळालेल्या युनिटचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


