न्हावी ३२२ येथील अर्धवट अवस्थेत असलेल्या सभागृहाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष यांनी दिला आंदोलनाचा इशारा! उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोर यांच्या कार्यालयसमोर करणार आंदोलन.


 

सारोळे – न्हावी ३२२, ता. भोर जि. पुणे येथे आपल्या विभागामार्फत वीर धरण पुनवर्सन योजनेंतर्गत अर्धवट अवस्थेत असलेल्या सभागृहाचे काम तातडीने सुरू करणेकामी संबंधीत ठेकेदार यांना तातडीने सुरु करण्यासाठी दि.१०/१२/२०२४ रोजी सकाळी ११ वा. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोर इथे उपोषण करणार आहे. ग्रामपंचायत न्हावी ३२२ मासिक सभा दिनांक २८.१०.२०२४ रोजी झालेला ठराव क्र.०९/०२ वरील विषयान्वये न्हावी ३२२ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वीर धरण पुनवर्सन योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभागृहाचे काम मंजूर होऊन सदरचे काम सुरू करणेत आले होते, परंतु सदर सभागृहाचे काम हे संबंधीत ठेकेदार यांनी केवळ ज्योता (फाऊंडेशन) पर्यंत केले असून गेली ८ ते १० महीन्यांपासून सदरचे काम हे रखडले आहे, त्यामुळे सदर नियोजित सभागृहाशेजारी असलेल्या गावच्या सामाजिक सभागृहाकडे जाणारा रस्ता हा बंद झालेला आहे. याबाबत सदर ठीकाणी संबंधीत ठेकेदार यांनी केवळ फाऊंडेशन पर्यंत काम केले असल्याने सदर ठीकाणी असलेले स्टील / सळई या वरच्या बाजुला खुल्या स्थितीत आहे. सदरहू ठीकाणी अंगणवाडी असल्याने लहान मुले मैदानात खेळत असतात, परंतु सदर ठीकाणी असलेले काम हे अपुर्ण स्थितीत असताना सदर ठीकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच रखडलेल्या सभागृहाच्या कामामुळे गावचे सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम, गाव सभा, तसेच अन्य सामाजिक कार्यक्रम पार पाडणेसाठी गावात अन्य पर्यायी जागा शिल्लक नसल्याने गावच्या ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे सदर अपुर्ण व अर्धवट स्थितीत असलेल्या कामामुळे गेली वर्षभर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी होऊन देखील सदर कामकाजाबाबत व अपूर्ण राहीलेल्या कामासंदर्भात ठेकेदार यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे, संबंधीत ठेकेदार यांना त्वरीत सुचना देऊन सदर अपुर्ण असलेले सभागृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून करावे असे ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे.

तरी सदर रखडलेले काम पुढील आठवड्यात सुरु न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी दि. १०/१२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोर येथील कार्यालयात उपोषण करण्यात येईल असे निवेदन सबंधित विभागाला देण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!