नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे गुणवंतांचा यथोचित सन्मान ;डॉ.मंदार माळी यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल यथोचित सन्मान.
कार्यकारी संपादक :सागर खुडे
किकवी : गणपती उत्सवामध्ये गावागावात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.आणि या दरम्यान विविध क्रिडा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नवतरुण गणेश मित्र मंडळ मोरवाडी यांच्या तर्फे मोरवाडी येथील गुणवंत विद्यार्थी तसेच राजस्तरीय व जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करून सन्मानित करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी ५व्या दिवसाच्या आरतीसाठी मिळालेला मान स्वीकारून जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे व भोर तालुक्यातील नावाजलेले आरोग्यदूत,आरोग्य आधिकारी डॉ.मंदार माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखविली. यादरम्यान त्यांच्याहस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर नवतरून मित्रमंडळ व समस्थ ग्रामस्थ मोरवाडी यांच्या वतीने उद्योजक विशाल अहिरे तसेच उद्योजक गोपाळ कोंढाळकर,सुरेश आहिरे,गोपाळ आहिरे यांच्या उपस्थित डॉ.मंदार माळी यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल आदर्श इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर पुरस्कार प्रदान करीत शालश्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
नवतरुण गणेश मित्र मंडळ तर्फे खालील विदयार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देवून गौरवविण्यात आले.
संस्कृती मोरे,अनिशा मोरे,ऋतिक मोरे,साहिल मोरे,प्रगती मोरे,प्रणव मोरे,यश मोरे,प्रगती मोरे,स्वरा मोरे,पियुष मोरे,प्रणाली मोरे,श्रृती भणगे,ऋषाली मोरे,श्रेयस मोरे,सोहम मोरे,सुमित मोरे,ओम मोरे,सत्यम श्रीरामे,शिवम मोरे,सचिन मोरे, स्वरा मोरे आदीं विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
प्रसंगी समस्त ग्रामस्थ मोरवाडी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्ज्वल भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण,गुणवत्तापूर्ण,विकासाठी सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे.
डॉ. मंदार माळी किकवी

नवतरुण गणेश मित्र मंडळ तर्फे गणपती उत्सवामध्ये दरवर्षी गुणवंतांचा सन्मान केला जातो. यावर्षी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे अभ्यासाची गोडी वाढते.विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण होते.
युवा उद्योजक विशाल आहिरे किकवी


