खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सचिन कुंभार यांनी इकोफ्रेंडली ए सी जी मेटल क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्लांट डेकोरेशन साकारले आहे.
दि.१२ खंडाळा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
पर्यावरण विरहित कंपनी प्लॅन चे डिझाईन गणपती निमित्त तयार वेगळी सजावट करण्याचे त्यांचे स्वप्न आज साकार झाले सचिन कुंभार यांनी हे डेकोरेशन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली होती जसा कंपनीतून घरी आल्यावर वेळ मिळेल तसे त्या डेकोरेशन साठी वेळ देत आपली सर्व मेहनत त्यांनी या डेकोरेशन साठी लावली. विशेष म्हणजे या डेकोरेशन साठी जे मटेरियल वापरले गेले आहे हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे पर्यावरण विरहित मटेरियल वापरले गेले आहे हे डेकोरेशन पाहण्यासाठी शिरवळ येथील गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

कुंभार यांनी या सजावटीच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाविषयी एक अनोखा संदेश या सजावटीतून दिला आहे प्लास्टिक असेल तर सजावट करू शकतो असे काही नाही आपण पर्यावरणाचा विचार करून डेकोरेशन करायला हवे असा त्यांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.


