मेढा येथिल सामान्य कुटुंबातील अविनाश धनावडे राज्यात अव्वल राज्य राखीव पोलिस दलात १९३ गुण मिळवून टाॅपर
प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मामुर्डी गावचे सुपुत्र व मेढा येथे रहिवासी असणारे सामान्य कुटुंबातील,वडाप वहातुक करणारे बाबा धनावडे यांचे चिरंजीव कु.अविनाश धनावडे यांनी राज्य राखीव पोलिस दलाची परिक्षा १९३ गुण मिळवित राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला असून त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार सामाजिक कार्यकर्ते श्री विलासबाबा जवळ यांनी व्यक्त केले आहेत.

मेढा येथिल वेण्णा चौक व्यापारी मित्र समुहाच्या वतीने चि. अविनाश धनावडे यांचा सन्मान करण्यात आला. अविनाश यांचे वडील बाबा धनावडे यांचा दोन वर्षापूर्वी मोठा अपघात झाला होता. जीवनाशी संघर्ष करीत दवा व लोकांकडून त्यांना मिळालेला दुवां याचे बळावर बाबा धनावडे हे याच्यातून बरे झाले.गेली दोन वर्ष वडीलांची सेवा करीत असताना आपल्या ध्येयापासून अविनाश हे तसूभरही हटले नाहीत. जिद्द,चिकाटी,मेहनत घेवून शारिरीक व्यायाम, अभ्यास या गोष्टी सातत्याने सुरू ठेवल्या होत्या.गतवर्षी पोलिस भरतीमध्ये केवळ १ मार्कने यशाने हुलकवणी दिली पण खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यास करून अविनाश यांनी राज्य राखीव बलाची परिक्षा १९३ गुण मिळवून राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला.त्यांनी मिळविलेले यश प्रेरणादायी व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असल्याने त्याच्या या यशाचे सर्वच स्थरातून कौतुक होत असून वेण्णा चौक व्यापारी मित्र समूहाच्या वतीने अविनाश यांचा घरी जावून पेढ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी पांडूरंग धनावडे टेलर,संजय जुनघरे,सुरेश शेलार,अजित धनावडे,ओंकार मोहळकर, अरविंद जवळ,संतोष पवार, आकाश ओसवाल,गणेश भोसले, अंबालाल गांधी,शैलेश पवार,कुणाल ओंबळे इ.उपस्थित होते.


