भोंगवली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!नासा-इस्त्रो संशोधन केंद्र भेटीसाठी वरद शेडगे याची निवड


मंगेश पवार

दि. 19 सारोळे :- भोर तालुक्यातील भोंगवली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी वरद महादेव शेडगे (इयत्ता सातवी) याने मोठे यश मिळवले आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून वरदची निवड थेट नासा-इस्त्रो संशोधन केंद्र भेटीसाठी झाली आहे.

 

या स्पर्धेत एकूण १६,१२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. पहिल्या फेरीत १३,६७९ विद्यार्थी, दुसऱ्या ऑनलाइन फेरीत १,५४९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर मुलाखतीसाठी २३५ विद्यार्थ्यांची निवड झाली. अंतिम फेरीतून फक्त ७५ विद्यार्थ्यांना नासा-इस्त्रो भेटीसाठी पात्रता मिळाली असून त्यात वरद शेडगेचा समावेश आहे.

 

वरदच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण भोंगवली गावासह पंचक्रोशीमध्ये आनंदाचा माहोल आहे. गावकऱ्यांनी, पालकांनी, ग्रामपंचायतीने, शाळा व्यवस्थापन समितीने व शिक्षकवृंदाने त्याचे कौतुक केले आहे.

ADVERTISEMENT

“वरद शेडगेच्या या यशाने भोंगवली गावाचा सन्मान वाढवला आहे. तो भविष्यात नक्कीच मोठ्या उंचीवर पोहोचेल,”
असे शिवप्रहार प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी सांगत वरदचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

 

 

शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच स्वतःच्या मेहनतीमुळे वरदने हे यश मिळवले. “आपल्या शाळेत असे होतकरू विद्यार्थी घडणे हे आमच्या भाग्याचे लक्षण आहे. भविष्यात असेच विद्यार्थी गावाचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील,” असे मत ग्रामस्थ व पालकांनी व्यक्त केले.

 

“वरद हा आमच्या शाळेत शिकत असलेला अतिशय गुणी व जिद्दी विद्यार्थी आहे. त्याच्या मेहनतीला मिळालेलं हे यश संपूर्ण शिक्षकवर्गासाठी अभिमानाची बाब आहे,”असे जि.प. प्राथमिक शाळा भोंगवलीचे शिक्षक पांडुरंग जगताप यांनी सांगितले.

 

 

 

वरद शेडगेच्या या यशाबद्दल ‘पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज ’ परिवाराकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!