आधारवड वॄध्दाश्रम येथील आजी-आजोबांना वाघजाई माता मंदिर व स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दर्शन
भोर: शहरातील आधारवड वॄध्दाश्रम येथील आजी-आजोबांना जेष्ठ नागरिक दिन निमित्त शुभेच्छा भेट दिली होती.
त्यावेळी त्यांनी नवरात्र उत्सव निमित्त
वाघजाई माता देवीच्या दर्शनासाठी जायची ईच्छा व्यक्त केली होती.
याला प्रतिसाद म्हणून ऊत्रोली गावचे गाडी व्यावसायिक श्री दादा शेंडगे यांनी दोन गाड्या मोफत उपलब्ध करून ड्रायव्हर साळुंखे व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गोळे यांनी सुखरूप १५
आजी आजोबा ना आधार वड वृध्दाश्रम येथून काळजीपूर्वक गाडी मध्ये बसुन वाघजाई माता मंदिर येथे आणले
यावेळी वाघजाई माता मंदिर ट्रस्ट चे वतीने श्री अप्पा राऊत यांनी सर्व जेष्ठ नागरिक, गाडी मालक, यांना यात्रा कमिटी चे वतीने सन्मानित केले.
नवरात्रीच्या निमित्ताने आलेल्या सर्व खेळणी , आईस्क्रीम, पुस्तक स्टॉल ला भेट देऊन समाधान व्यक्त केले.यानंतर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे सर्व आजीआजोबा नी स्वामी चे दर्शन घेऊन
हा उपक्रम राबविला बद्दल संतोष कदम यांचे आभार मानले.
यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चे अतुल धुमाळ ,सुर्वे काका , प्रकाश कनबरगे , वाघजाई ट्रस्ट चे रवि भेलके, बांदल उपस्थित होते.


