शिरवळच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आयुष्यमान आरोग्य मंदिरात पिंपळाचे वृक्षारोपण


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज

शिरवळ (दि. १८ ऑगस्ट २०२५) – पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिरवळचे सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कांबळे आणि श्री. अमर राऊत यांनी अलीकडेच वाठार किरोली (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे स्थापन झालेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरास सदिच्छा भेट दिली.

 

उल्लेखनीय म्हणजे, हे आरोग्य मंदिर १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक उपयोगासाठी खुले करण्यात आले होते. या भेटीच्या वेळी कार्यकर्त्यांनी तेथील आरोग्य अधिकारी डॉ. अनुज महादेव कांबळे यांना दीर्घायुष्य, शहाणपण आणि संरक्षणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तसेच चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा करणारे पिंपळाचे झाड भेट दिले.

ADVERTISEMENT

 

औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे वाढते तापमान, प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्ती या समस्या गंभीर बनल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या आवारात पिंपळाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.

 

या कार्यक्रमात डॉ. शितल मायने (समुदाय आरोग्य अधिकारी), उद्धव राऊत (कनिष्ठ सहाय्यक), संतोष गायकवाड (आरोग्य सहाय्यक), प्रविण फुलसावंगे (आरोग्य सेवक), श्रीमती प्रगती माळी (औषध निर्माण अधिकारी) यांच्यासह अनिकेत गायकवाड, सचिन बाबर, संगीता बाझारे, सुदर्शन कांबळे आदींनी उत्साहाने सहभाग घेतला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे हे वृक्षारोपण स्थानिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!