भोर तालुक्यातील नायगाव येथे जाणाऱ्या रोडच्या कडेला 17 वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
नसरापूर : भोर तालुक्यातील नायगाव येथे 17 वर्षीय विद्यार्थ्याने झाडाच्या फांदीला साडीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या चुलत भावाने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 03/12/2024 रोजी भाऊ शिवराज हा मेरावणे ता. वेल्हा जि पुणे येथे गावी आला होता,त्याचे आईवडील हे पुण्यात राहणेस असल्याने तो दत्तात्रय रेणुसे यांच्याकडे राहिला होता. दि.04/12/2024 रोजी सकाळी 09:00 वाजता चुलतभाऊ शिवराज हा दत्तात्रय रेणुसे यांच्या घरातुन परिक्षेसाठी नायगाव येथे गेला. दत्तात्रय रेणुसे हे वेल्हे येथे त्यांच्या दुकानात गेले.त्यानंतर सायंकाळी दत्तात्रय रेणुसे यांचे चुलते किसन भिका रेणुसे यानी त्यांना फोन केला व सांगितले की शिवराज उर्फ दादया अजुन पुण्याला घरी गेला नाही तो कुठे आहे हे तुला माहीत आहे काय,मी नाही म्हणाल्यावर पुण्यातील शिवराज याची आईला फोन करून त्याचे शिक्षकांना फोन करून माहीती घ्यायला सांगीतली त्यानंतर काही वेळा ने चुलती विदया यांनी फोनवर सांगीतले की दादया पेपरलाच गेला नाही म्हणुन आम्ही नातेवाईक व त्याचे मित्रांकडे नसरापूर येथे येवून शिवराज याचा शोध घेत होतो, त्याचवेळी शिवराज याचा कालेजचा मित्र सुरज पवार याचा माझा चुलत भाउ करण लक्ष्मण रेणुसे याला फोन आला व त्याने सांगितले की, तुम्ही चेलाडी येथे या आलेवर मी तुम्हाला सगळ सांगतो,असे म्हणाला त्यानंतर रेणुसे आणि सर्वजन चेलाडी येथे सुरज पवार याचेकडे आलो आलेवर तो आम्हाला पोलीस स्टेशन येथे घेवून आला व त्याने आम्हाला पोलिसांच्या समक्ष सांगीतले की, नायगावकडे जाणारे रोडचे कडेला जिथे सर्व मुले आभ्यास करीत असतात तेथे झाडाला कोणीतरी लटकत आहे हे आम्ही पाहीले आहे आम्ही घाबरलो असल्याने जवळ गेलो नाही तरीतुम्ही सोबत येवून खात्री करा असे म्हणाल्यावर आम्ही सर्वजन त्या ठिकाणी गेलो असता एका बाभळीच्या झाडचे फांदीला माझा चुलत भाऊ शिवराज नारायण रेणुसे वय 17 वर्ष रा मेरायण ता वेल्हा जि पुणे याने साडीच्या साहयाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला त्यानंतर आम्ही आमचे नातेवाईक व त्याचे मित्र व पोलीसांचे मदतीने भाऊ शिवराज याला बेशुध्द अवस्थेत गळफासातुन खाली उतरवुन सिध्दिविनायक हॉस्पीटल नसरापुर येथे नेले असता तेथील डाक्टरांनी तपासुन उपचारापुर्वी तो दिनांक 05/12/24 रोजी मध्यरात्री 01:30 वा च सुः। मयत झाल्याचे सांगीतले आहे. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.


