अज्ञात चोरट्याने नसरापूर गावातील उद्योजक मोबाईल शॉपी मधील मोबाईल केले लंपास.


पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज

कार्यकारी संपादक: सागर खुडे

भोर : नसरापूर येथील उद्योजक मोबाईल शॉपी चे शटर उच कडून मोबाईल चोरी करण्यात आली. 40000 रुपयाचे रिपेरिंग करायला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

त्याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की नसरापूर येथील उद्योजक मोबाईल शॉपीचें मालक वैष्णव सोमनाथ पुजारी वय २०वर्ष, गाव मोहरी ता. भोर जि.पुणे,व्यवसाय मोबाइल विक्री आणि दुरुस्ती.

वैष्णव पुजारी हे ४डिसेंबर रोजीचे सकाळी १०वाजतामोबाईल शॉपी उघडल्यानंतर दिवसभरात बरेच ग्राहक येणे जाणे चालू होते.त्यातीलच काही ग्राहकांचे मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी ठेऊन घेतले व संध्याकाळी १०वाजता दुकान बंद करून घरी मोहरी येथे परतून आल्यानंतर दि.५डिसेंबर२०२४रोजीचे सकाळी ७वाजण्याच्या सुमारास गाळ्याचे मालक पराग इंगुळकर यांचा फोन आला आणि अर्धे शटर उघडे असल्याचे समजले.तात्काळ धाव घेत पाहिलं तर दुकानाचा टाळा तोडून अर्धे शटर उघडलेल्या अवस्थेत बघून आत प्रवेश करून गेल्यावर दुकानातील काउंटर वरील सर्व दुरूस्ती करण्याचे साहित्य अस्ताव्यस्त दिसल्याने गोंधळात पडले. आजूबाजूला पुर्ण पाहणी केली असता समजले की काउंटरवरील दुरूस्तीसाठी आलेले ६मोबाईल चोरी झाले.त्याचदिवशी अन्य काही ठिकाणी देखील चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर पोलीस चौकीमध्ये धाव घेततक्रार दिली असून त्यामध्ये अनुक्रमे गेलेल्या मोबाईलची वर्णने आणि किंमत पुढीप्रमाणे:

१)१०००० किमतीचा वनप्लस नाईन आर आकाशी रंग

२)५००० किमतीचा रेडमी थर्टीन सी- सिल्व्हर रंग

३) १०००० किमतीचा सॅमसंग एस-२३ ब्राऊन रंग

४) ५००० किमतीचाआयफोन सिक्सएस मेहंदी रंग

५) ५०००किमतीचा विवो वाय-२०निळा रंग

६)५००० किमतीचा सॅमसंग एम-३०काळा रंग

 

एकूण चोरी झालेल्या मालाची एकूण रक्कम ४००००असून त्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार महिला पोलीस कर्मचारी भांड यांनी दाखल करून घेतली.पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास बुरटे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!