स्वर्गीय कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी कुटुंबातला देव माणूस, कुटुंबाचा प्रमुख आणि शोभा निघून गेली,
सातारा प्रतिनिधी: जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र आणि सातारा करंजे या ठिकाणी वास्तव्यास असणारे स्वर्गीय कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ ( तात्या )यांचे दीपावलीमध्ये हृदयविकारांच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले, त्यांच्या जाण्यांने अजूनही हळहळ व्यक्त होत आहे, कुटुंबामध्ये त्यांची नेहमीच उणीव भासत आहे, तात्यांचा जीवन प्रवास अतिशय सर्वांशीच प्रेमळ ठरला,कुटुंबासह अनेक त्यांनी माणसं जोडली होती, कुटुंबात ते प्रमुख म्हणून ओळखले जायचे,आपल्या मोठ्या कुटुंबाचा त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, कुटुंबातील आपल्या पत्नी मुलांसमवेत तसेच कुटुंबातील सदस्यांशी ते मित्रा सारखे राहिले, रिक्षा व्यवसाय तसेच जागरण गोंधळ अशा कार्यक्रमांच्या माध्यमांतून तात्यांचे नाव हे अनेक ठिकाणी ओळखले जात होते, तात्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला, गावामध्ये देखील ते रामभाऊ सातारवाला अशी त्यांची ओळख होती, तात्यांनी अतिशय खडतर प्रवासांतून आपल्या पत्नीसह तीन मुलांसमवेत संसार थाटला होता, त्यांना आता सुखाचे आणि आरामाचे दिवस समोर होते, पण नियतीने आमच्या कुटुंबावर काळाचा घाला घातला, तात्या कुटुंबातच नव्हे तर सर्वांशीच ते मित्राप्रमाणे राहिले, तात्यांची कुटुंबातील सर्वांवर करडी नजर होती, तात्यांचा परिवार हा मोठा होता, पण तात्यांच्या आजपर्यंतच्या शब्दाला कुटुंबातील मुलांनी त्यांच्या पुतण्यांनी गालबोट लागू दिला नाही, तात्यांचा शब्द आम्ही नेहमीच पाळला जायचा, आम्हांला स्वप्नातही वाटले नव्हते की तात्या आमची लवकर साथ सोडतील, तात्यांच्या असणे अजूनही आम्हांला हवेसे होते, तात्या म्हणजे आमच्या कुटुंबाची एक शान आणि शोभा होती, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत संपूर्ण कुटुंब चालत होतं, तात्यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये कधी कुणाचे मन किंवा वादीवाद कधीच निर्माण केला नव्हता, सर्वांशी ते अगदी प्रेमळ शांतप्रिय बोलायचे, कुटुंबात धार्मिक लग्न सोहळा तसेच कोणत्याही कार्यक्रमांचे नियोजन त्यांच्याकडे राहायचे, खरंच तात्यांची उणीव ही आमच्या कुटुंबाला तर कायमच भासणार आहे, पण असे म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला…! खरंच आमचे तात्या हे देवांनाच नव्हे तर सर्वांनाच आवडत होते, तात्यांबद्दल बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं, माझे चुलते असले तरी त्यांनी कधीही चुलतेच्या नात्याप्रमाणे कधीच राहिले नाहीत, माझ्या वडिलांच्या निधनानंतर कायम माझ्या संपर्कांत आणि माझ्यावर देखील त्यांची करडी नजर होती, सन 2005 पासुन कधीही वडिलांची आठवण त्यांनी मला भासु दिली नव्हती, तात्या म्हणजे पुरीगोसावी कुटुंबातला एक देव माणूसच होता, खरंच तात्या तुम्ही अचानक आपल्या कुटुंबाची साथ सोडली, पण तुमचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाच्या पाठीशी कायम सोबत राहू द्या, खरंच तात्या तुमची आठवण जर आली तर कुटुंबातील सर्वांचेच डोळे पाणवले जातात, तात्यांच्या पश्चांत पत्नी तीन मुलै सुना नातवंडे पुतणे भाऊ भावजय बहीण लेक,जावई असा त्यांचा परिवार आहे.

