प्रदीर्घ संघर्षानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात प्रस्थापितांना चितपट करून रमेश आप्पा कराड यांनी परिवर्तन घडविले; ओबीसी चेहरा, मराठवाड्यातील यश यामुळे मंत्री होण्याची संधी.


मुख्य संपादक :मंगेश पवार

पुण्यभूमी न्यूज नेटवर्क.

दि. 1 लातूर प्रतिनिधी : राज्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या ४ दिवसांपासून सस्पेंस होता. अखेर काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं देखील बोललं जात आहे.

 

मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातेही कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असतील. कारण भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काही नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या जागी नवीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

 

 

ओबीसी चेहरा, मराठवाड्यातील यश यामुळे रमेश कराड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.आपली ताकद वाढवण्याचा भारतीय जनता पार्टी रमेश कराड यांना मंत्रीपद देऊन लातूरमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करु शकते.

 

रमेश आप्पा कराड भाजपचा चेहरा, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती आणि आक्रमक नेतृत्व यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

 

प्रदीर्घ संघर्षानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात नवे परिवर्तन घडून आले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती झाली.

 

मागील दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करूनही कधीच खचून न जाता सातत्याने सर्व सामान्यांचे हितासाठी कार्यरत राहिल्याने, गोरगरिबांचे, सर्वसामान्य शेतकरी वर्गाचे कार्यसम्राट आ.रमेश कराड यांच्यावर जनतेचा विश्वास मजबूत झाला. त्यांनी मतदारसंघात वाडी,वस्ती,गावोगावी,घरोघरी जाऊन ग्रामस्थांची शेतकऱ्यांची तरुणांची कामे करून दिली. त्याचसोबत महायुतीच्या “लाडकी बहीण योजना” घरोघरी पोचून महिला मंडळ यांना माहिती दिली.त्यांनी विधानसभा सभागृहात काम करावे, ही सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची,तरुणांची अनेक वर्षांची इच्छा या निवडणुकीत पूर्ण झाली. असे म्हणायला काही हरकत नाही.

 

 आप्पांचे काम पाहून पक्षश्रेष्टीने त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. मिळालेल्या संधीच्या माध्यमातून गोरगरीब, सर्वसामान्य, शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे आणि ग्रामीण भागातील गावागावात वाडी, वस्ती वर वीज,रस्ते अशा विकासकामांना कोट्यवधीचा निधी मिळून दिला.‌ मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवलं.

नानासाहेब धाडवे पाटील वकीलपुणे,भोर

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!