कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू..
आदी विभागाची माहिती देणारे स्टॉल आहेत. तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन अवजारे, यंत्रे यांची माहिती देणारे स्टॉल यावेळी पहायला मिळणार आहेत.
कराड प्रतिनिधी,:- स्वप्निल गायकवाड
याचबरोबर तांदूळ महोत्सव, जनावरांचे प्रदर्शन, अमेझॉन पार्क तसेच महिला बचतगटांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात विविध प्रकारच्या सुमारे चारशे स्टॉलनी सहभाग नोंदवला आहे. हे सर्व स्टॉल बुक झाले असून, यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होवूनही सर्व पातळीवरून प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. डायनॅमिक इव्हेंटच्या वतीने धीरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याकामी सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे,राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, संभाजी चव्हाण, विजयकुमार कदम, सतीश इंगवले,जयंतीलाल पटेल,सर्जेराव गुरव,गणपत पाटील,श्रीमती इंदिरा जाधव – पाटील, सौ.रेखा पवार,जगदीश जगताप,दयानंद पाटील,मानसिंगराव जगदाळे,सोमनाथ जाधव,उध्दव फाळके,प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, सर्व कर्मचारी, शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी याकामी परिश्रम घेत आहेत.


