छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब विश्वसनीय सूत्रांची माहिती; भाजपचा पहिल्या यादीत मिळणार स्थान;
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
जावळी ( सुनिल धनावडे ):- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण याबाबत केंद्रीय नेतृत्वाने गुप्तता पाळली असली तरी पुढील महिन्यात ५ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आजाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. महायुतीकडून याची जोरदार तयारी सुरू झाली असून शपथविधीसाठी केंद्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील अनेक सदस्य शपथ घेणार असून भाजपच्या पहिल्या यादीतच सातारा जावळी विधानसभेचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव सामील असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेली आहे.
त्यामुळे बाबाराजे प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नव्या सरकारमध्ये अनेक आमदार मंत्री पदासाठी इच्छुक असून बाबाराजेंच्या मंत्रीपदासाठी त्यांचे मोठे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा जिल्ह्यात महायुतीसाठी किंग मेकर ठरले मुळे ते स्वतः आग्रही असल्यामुळे सातारा जावळी तालुक्यातील लाल दिवा फिक्स झालेची माहीती मिळाली आहे त्यामुळे सातारा – जावळी तालुक्यात आनंदाचे वातावरण झाले आहे.