कुस्ती स्पर्धेत सारोळे विद्यालयाचे घव-घवीत यश.
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद क्रीडा विभाग पुणे आयोजित भोर शहरातील अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सारोळे येथील दिनकरराव धाडवे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे मधील विद्यार्थ्यांनी यावर्षीही चमकदार कामगिरी केली आहे.
विद्यालयातील ५७किलो वजनी गटात कु.ओमकार हेमंत ताठे आणि कु.अजिंक्य अविनाश ताठे ११०किलो वजनी गटात या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
तसेच विद्यालयातील कु.श्रेया संतोष शिरगावकर या मुलीने ६२ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन ताकवले सर यांनी अभिनंदन केले. यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद गुजर व स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.प्रदीप पाटील आणि सेक्रेटरी श्री.प्रकाश गोर यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक नाळे सर व शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.


