वंदना माने यांना राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार.
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा : जावली तालुक्यातील बिभवी गावचे सुपुत्र डॉ.दिपक माने यांच्या पत्नी व स्मृतिषेश बाबुराव ओंबळे सरकार , पांचगणी यांची नात वंदना माने यांना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार जो स्टेज वरील कार्यकर्त्यां पेक्षा प्रसिद्धीत न राहता निष्ठेने काम करणाऱ्यांना दिला जातो तो *साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक*,वडघर(माण गांव) येथे जेष्ठ
कवयित्री *नीरजा* यांचे हस्ते व बाल साहित्यिक,विज्ञान कथाकार *राजीव तांबे*,अं.नि.स .ट्रस्टी दिपक गिरमे,अरविंद पाखले ,संपादक राजीव देशपांडे,सह संपादक मुक्ता दाभोलकर,हमीद दाभोलकरआणि राज्यभरातून आलेले २०० हून जास्त जेष्ठ कार्यकर्ते यांचे उपस्थितीत देण्यात आला.
यावेळी नीरजा ताई यांनी खैरलांजी – कोपर्डी – व्हाया दिल्ली ही भेदक स्त्री जीवन वास्तव मांडणारी कविता सादर केली .
यापुढेही जोमाने कार्यरत राहून सामाजिक काम करत ही दिलेली मोठी जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार वंदना माने यांनी व्यक्त केला.
त्यांचे डॉ. शैलाताई दाभलकर आणि सर्व सामाजिक, कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


