सावरदरे गावातील खराब रस्त्यासाठी बांधकाम विभागाला पाठपुरावा ! सरपंच गणेश साळुंके
दि. २१ सारोळे : सावरदरे गावातील मुख्य रस्त्याची पावसामुळे तसेच निकृष्ट दर्जाचे काम यामुळे चाळण होऊन रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर खडी आणि माती पसरली असून पूर्णतः रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तसेच ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागत आहे.रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी सावरदरे नागरिकांच्या वेळोवेळी होणाऱ्या मागणीमुळे गावचे युवा सरपंच गणेश ज्ञानोबा साळुंखे यांनी पाठवपुरवा करत मागील काही दिवसांपूर्वी पीडब्ल्यूडी बांधकाम विभाग भोरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर त्यांना लेखी मागणी पत्र सुपूर्द करून रस्त्याच्या दुरूस्तीसाठीचे निवेदनपत्र दिले. त्यावर त्यांनी जास्तीत जास्त दोन दिवसांमध्ये रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.
सदरचे निवेदन देताना अक्षय नामदेव साळुंखे,अशोक तुळशीराम काळे, सागर कृष्णा साळुंखे, किरण दीपक साळुंखे, रमेश दत्तात्रय साळुंखे, अभिजीत अनिल यादव, यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


