धांगवडीकरांच्या स्वागताने संत कान्हूराज पालखीतील वारकरी भारावून गेले! ग्रामस्थांनी केली १२०० लोकांची जेवणाची व्यवस्था.
सारोळे : पावसाने दिलेली ओढ अन् उन्हामुळे जिवाची काहिली तसेच ढगाळ वातावरणात विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या लाखो वैष्णवजणांचा मेळा संत कान्हूराज महाराज पालखी सोहळा धांगवडी येथे दाखल झाला. प्रथेप्रमाणे धांगवडीकरांनी पालखीचे मोठ्या आनंदोत्सवात स्वागत तर केलेच, शिवाय आपल्या दारी आलेल्या वारकऱ्यांच्या पाहूणचाराला तितक्याच आनंदाने सुरुवात केली.
संत कान्हूराज महाराज पालखी सोहळ्यासाठी धांगवडीकर दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. कमालीची स्वच्छता, वारकऱ्यांना जेवणासाठी बेसन आणि भाकरी करतात.आळंदीहून प्रस्थान ठेवल्यानंतर संत कान्हूराज महाराज यांची पालखी दि. ४ रोजी गुरुवार दुपारी १२ वाजता धांगवडी येथील श्री क्षेत्र अडबलनाथ मंदिर पाशी आले . या पालखीचे हे ४९वे वर्षे चालू आहे. पालखी सोहळ्याचा दिनक्रम बुधवार दि. २६/६/२४ ते आषाढ वैद्य दशमी मंगळवार दि. ३०/७/२४ हा आहे. हा पालखी सोहळा श्री क्षेत्र केंदूर -पाबळ कनेरकर,आळंदी ते पुणे सातारा रोडवरून, शिरवळ, लोणंद मार्गे श्री क्षेत्र पंढरपूर असा आहे.
कान्हूराज महाराज पालखी नेहमीप्रमाणे दुपारी आल्यानंतर पालखी सोहळ्याचे सन्मानपूर्वक स्वागत धांगवाडी गावचे सरपंच सचिन तनपुरे यांनी केले. दिलीप तनपुरे यांनी वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले .माजी सरपंच आनंदा तनपुरे यांनी पालखीचे नियोजन केले. तसेच तरुण ग्रामस्थ मंडळ धांगवडी उपस्थित होते. यावेळी तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद वारकऱ्यांना जेवण वाढण्यासाठी होता.
त्यानंतर १२०० लोकांनी जेवण केल्या नंतर विसावा घेतल्यावर पालखीने पुढे प्रस्थान ठेवले. त्यानंतर सारोळे येथे ५ वाजता चहापाण्यासाठी परत थांबली.
सायंकाळी कान्हूराज महाराज पालखीचे शिरवळ येथे आगमन झाले. आगमन झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. त्यानंतर हा पालखी सोहळा मुक्कामासाठी शिरवळ येथे विसावला.