पंढरपूरच्या आषाढी वारीचे सागावमधून जल्लोषात प्रस्थान! लोकनियुक्त सरपंच सागाव अस्मिता पाटील.


कराड सातारा प्रतिनिधी:- स्वप्निल गायकवाड.

सातारा कराड :  हजारो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात.ही परंपरा सागाव मध्ये शेकडो वर्षांपासून जपली आहे.गुरुवार दिनांक ४जुलै २०२४ रोजी अखंड हरिनाम व टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साही व आनंदी वातावरणात या वारीचे प्रस्थान झाले.

अनेक वारकरी ४०/५० वर्षे सलग पाई वारी करत आलेले आहेत. ७० ते ८० वर्षाचे वयोवृद्ध स्त्री-पुरुष देखील यामध्ये सामील झाले आहेत.गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या संख्येत लक्षनिय वाढ झाली आहे.१२ व्या शतकातील नातपंथीय संत गोरक्षनाथ यांची शिराळा येथे असलेल्या कर्मभूमी व समाधी जवळ आज पहिला मुक्काम होईल.त्यानंतर सुमारे १४ दिवसात ही पायी वारी पंढरपूर येथे पोहोचते.पावसाळ्याचे दिवस असल्याने वारीमध्ये आसऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे वारकऱ्यांचे प्रचंड हाल होत असतात.अनेक दानशूर या वारकऱ्यांची खाण्यापिण्याची व काही वेळा विश्रांतीची व्यवस्था करत असल्याने थोडाफार दिलासा मिळतो परंतु त्यापेक्षाही अधिक दिलासा मुखी विठ्ठलाचे नामस्मरण करून भेटीची ओढ लागलेल्या या तहान भुक विसरलेल्या वारकऱ्यांना मिळतो.

या वारकऱ्यांना प्रस्थानावेळी अल्पोपहार देऊन शुभेच्छा दिल्या.आनंदाची बाब म्हणजे यावेळी प्रथमच सागाव ग्रामपंचायतने बांधलेल्या नवीन वास्तूमध्ये विश्रांतीची व मुक्कामाची सोय होणार आहे.सन २०१६ मध्ये वारकऱ्यांचे प्रतिनिधी असलेले माजी उपसरपंच श्री शिवाजी माने यांना सागावच्या सुसंस्कृत व आध्यात्मिक विचाराचे प्रेरणास्थान दहीठणकर सर यांनी मुक्कामाचे व्यवस्था व्हावी व त्याची सुरुवात तुमच्याकडून व्हावी अशी सूचना केली,त्यांचे सहकारी माजी उपसरपंच सत्यजित पाटील, अशोक कोकाटे,एम.आर.पाटील,कृष्णात पाटील बावरे,श्रीकांत पाटील,मानसिंग पाटील चिखलकर. दिलीप भोळे पाटील, राजेंद्र लुगडे व सर्व वारकऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नावे पंढरपूरनजीक २ गुंठे जागा घेतली.

मागील सरपंच तात्या पाटील यांच्या काळात या वास्तूचे भूमिपूजन झाले व नुकतेच ही वास्तू वारकऱ्यांसाठी खुली झाली.तत्कालीन सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक या वास्तूबाबत ट्रस्ट न करता ती सर्व गावाच्या मालकीची म्हणून ग्रामपंचायत सरपंच यांचे नावे केली.आपल्या स्वतःच्या वास्तूचा लाभ मिळत असल्याची भावना व त्यातून ओसंडून वाहणारा आनंद सर्वसामान्य गोरगरीब वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.

सर्व वारकऱ्यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो! शेकडो वर्षांची ही अखंड परंपरा निर्वीघ्नपणे यापुढे देखील चालू राहो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!