किकवी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
सारोळे : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम शुक्रवार दि.५ रोजी घेण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कोंढाळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र निगडे, सचिव राजेंद्र भोसले, संचालक राजेंद्र कोंढाळकर, प्रीतम घारे, मौलाउद्दिन शेख, दिनेश लाळे , सचिन निगडे, प्रमोद भालघरे,बाळासाहेब राऊत , योगेश जाधव तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते
. या वेळी मिलिंद मगर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत सर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक मध्ये “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या संत वचनाप्रमाणे वृक्षांचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणूक ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यक्रमात देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व सांगून प्रत्येकाने झाडाचे संवर्धन करण्याबाबत आव्हान करण्यात आले.
असे उपस्थित विद्यार्थी मुले, मुली पालक वर्ग यांना सांगितले.
आलेल्या सर्व पाहुण्यांचा विद्यालयाच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण साठी प्रीतम घारे,सचिन निगडे, निलेश लाळे, रवी मोरे यांनी मदत केल्या बद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.