टापरेवाडी गावात रात्री भरले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म! महिला मंडळा तर्फे कुलदीप कोंडे युवामंच आणि विकास चव्हाण मित्र मंडळ यांच कौतुक.
सारोळे : पूर्व भागातील गावांमध्ये कुलदीप कोंडे युवा मंच वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरण्याचे काम राजापूर,भोंगवली,भांबवडे,न्हावी गावात झाले असून पुढील टापरेवाडी गावा मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रविवार दि.११ऑगस्ट २४ रोजी महिलांची मागणी असल्यामुळे रात्री दहा ते एक वाजेपर्यंत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांनी सुद्धा छान प्रतिसाद दिला. ४९ महिलांचे ऑनलाईन फॉर्म रात्री भरून झाले.
कुलदीप कोंडे युवा मंच व युवा सरपंच विकास चव्हाण मित्रपरिवार तर्फे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
मागील काही दिवसापूर्वी महिलांच्या बैठका झाल्या होत्या त्या वेळी शलाका कुलदीप कोंडे यांना उपस्थित महिलांनी सांगितले होते की,ऑनलाईन फॉर्म भरले जात नसल्याची अडचण सांगितली होती.
त्यावेळी पेंजळवाडी गावचे युवा सरपंच विकास चव्हाण स्वतः जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी फॉर्म भरून घेत होते.
महिला वर्गामध्ये या कामाचे कौतुक केले जात आहे. कुलदीप कोंडे युवा मंचचे काम खूप छान आहे. महिलांसाठी जि. प. सदस्य शलाका कोंडे यांनी स्वतः थांबून पूर्व भागातील सर्व गावांमध्ये फॉर्म भरून घेतले आहेत.
याप्रसंगी टापरेवाडी ग्रामस्थ महिला मंडळ,समीर चव्हाण,ओमकार चव्हाण,मेघराज चव्हाण, चंदू चव्हाण,सूर्या चव्हाण, अतुल हिंगे,गौरव टापरे,शुभम टापरे,विश्वास हिंगे,प्रकाश गायकवाड,मनोज हिंगे,इमाम गुळेकर,सुजित पवार,अभिजीत टापरे,रोहित टापरे, सचिन टापरे,अविनाश यादव,साहिल टापरे,मयूर जाधव,रोशन टापरे,सागर टापरे आणि युवा तरुण वर्ग उपस्थित होता.
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे