भोर तालुक्यातील किकवी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार! तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सारोळे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंर्तगत तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पुणे सातारा महामार्गावरील किकवी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अमृत महाअवास अभियान पुरस्कार २०२२-२०२३ राज्य पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) तालुकास्तरीय
सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत किकवी ता. भोर जि. पुणे यांस अमृत महा आवास अभियान पुरस्कार २०२२-२३ अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या प्रकारात प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे (आमदार भोर, राजगड,मुळशी ) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे,मा.गटविकास अधिकारी किरण कुमार धनवडे, भोर चे प्रांताधिकारी कचरे, भोरचे तहसीलदार पाटील,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.बी. पवार, घोगरे तसेच इतर शासकीय अधिकारी वर्ग या सर्वाःच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारताना किकवी गावचे विद्यमान सरपंच नवनाथ कदम ग्रामसेवक विजय गेजग, ग्रामस्थ तानाजी अहिरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारण्यात आला. किकवी ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना गावात यशस्वीपणे राबवून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल या ग्रामपंचायतीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
किकवी ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, हागणदारीमुक्त गाव आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तत्कालीन ग्रामसेवक विजय गेजग यांनी प्रधानमंत्री आवास योजना गावात यशस्वीपणे राबविली होती. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.


