आयएएस दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळाचा पदभार स्वीकारला
पुणे प्रतिनिधी: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी दीपा मुधोळ-मुंडे यांनी महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय पदाचा पदभार स्वीकारला आहे, मुख्य प्रशासकीय कार्यालयात त्यांनी महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुखांच्या कामकाजा बाबत आढावा बैठक पार पडली, (अखेर चर्चेला पूर्णविराम ) पीएमपीच्या अध्यक्ष पदाचा पदभार घेण्यात आशिष येरेकर यांनी चांगलाच नकार दिला होता, त्यानंतर राज्य सरकारने ८ जुलै रोजीच दीपा मुधोळ-मुंडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती, बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली करून त्यांना पीएमपीचा कार्यभार देण्याचा निर्णय घेतला होता, पण खरा या पदावर आशिष येरेकर यांचीच री ओढत नकार देणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता, अखेर दीपा मुधोळ मुंडे यांनी या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रश्नांना अखेर पूर्णविराम लागला आहे, पुणे महापालिकेची पीएमटी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची पीसीएमटी या दोन्ही संस्थाचे २००७ मध्ये विलीकरण होऊन पीएमपीएमएलची स्थापना झाली होती, त्यासाठी एसपीव्ही कंपनी करण्यात आली, पीएमपीएमएल अध्यक्ष व व्यवस्थापकीय पदी संचालक पदी आयएएस दर्जेतील अधिकारी नियुक्त केला गेला आहे, या कंपनीच्या संचालक पदी पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर या दोन्हीही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आयुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे, आजपर्यंतच्या इतिहासांत जवळपास १७ वर्षात 22 अध्यक्ष बदलले गेले आहेत.