पुणे शहर चे पोलीस आयुक्त अमितेशकुमार साहेबांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट…!पुरीगोसावी यांच्याकडूंन स्वागत, 


 

पुणे प्रतिनिधी :   पुणे शहर चे विद्यमान आदरणीय पोलीस आयुक्त अमितेशकुमार साहेबांची दि. ६ रोजी दुपारी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद साहेब असे म्हणत… सदिंच्छा भेट घेवुन आयुक्त साहेबांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, पुणे शहर चे अमितेशकुमार साहेबांची पुणे शहर पोलीस आयुक्त पदी दिनांक ३१जानेवारी २०२४ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, नागपूरचे पोलीस आयुक्त पदावरून त्यांची पुण्यात बदली करण्यात आली होती, तर रितेशकुमार यांची पदोन्नतीने डी.जी होमगार्ड म्हणून बदली करण्यात आली होती, अमितेशकुमार साहेब हे नागपूरच्या इतिहासांत सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे, दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतलेले अमितेशकुमार कायदा व सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवीधर आहेत, अमितेशकुमार हे १९९५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी आत्तापर्यंत नागपूर मुंबईचे पोलीस उपायुक्त सोलापूर औरंगाबाद ( ग्रामीण ) पोलीस अधीक्षक अमरावतीचे पोलीस आयुक्त जबाबदारी सांभाळली होती, तसेच त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस शाखेच्या सहआयुक्त म्हणूनही काम पाहिले होते, नागपूर पोलीस आयुक्त होण्यापूर्वी अमितेशकुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते, अमितेशकुमार साहेबांनी आज पर्यंत अनेक जिल्ह्यात सर्वाधिकारी वर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत, केलेल्या उत्कृंष्ट कामगिरीमुळे अमितेशकुमार साहेब महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात चांगल्याच आणि उल्लेखनीय कामगिरीच्या रूपाने महाराष्ट्र पोलीस दलात त्यांचे नाव आजही चांगलेच समोर आहे.

ADVERTISEMENT

 

संभाजी पुरी गोसावी हे पुणे जिल्ह्यात पत्रकारिता करत आहेत. त्याच्या माध्यमातून पुरी गोसावी यांनी महसूल विभागात आणि पोलीस खात्यात आपलं चांगलं वलय निर्माण केलं आहे. पत्रकारितिच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात मोठा मित्र परिवार जमवला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!