लोणंद प्रभाग १४ मध्ये ओलांडली धोकादायक पूर नियंत्रण रेषा ?


दिलीप वाघमारे

सन 2021 22 च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 14 व 8 मध्ये अक्षरशा हाहाकार माजला होता या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

या ठिकानी कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या स्थानिक नगरसेवकांच्या व नगरपंचायत लोणंद तत्कालीन मुख्याधिकारी तसेच बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणामूळे प्रभाग क्र १४ मधील २ व्यक्तींना आपल्या जीवास मुकावे लागले.

याचे प्रमुख कारण असे की आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या प्रभागातून पुरातन खेमावती नदी पात्रास जोडणारा जुना मांग डोह कालव्याच्या ओढ्यालगत स्थानिकांनी त्याच प्रभागातील नगरसेवकांच्या प्रत्यक्ष सहभागातून ओढ्याच्या पूर नियंत्रणरेषावर भराव टाकून अतिक्रमण करत आपली घरे, इमारती उभारल्या असल्याने नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला धोका निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

यामध्ये अनेक आजी,माजी नगरसेवक,पुढारी, शिक्षक व इतर सरकारी कर्मचारी यांचे अतिक्रमण झाले असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

तसेच निम्म्या गावाचे सांडपाणी खेमावती नदीपात्रात सोडून नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या खेमावती नदी पात्र अतिशय दूषित करण्यात आले आहे.

नगरपंचायतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी STP (Sewage Treatment Plant) उभारणे बंधनकारक असते. प्रक्रिया न केलेले पाणी नैसर्गिक जलस्रोतात सोडणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना एक जबाबदार शासनाचे नोकर म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड हे जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा१९७४ चे तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ चे नियम अधिनियम धाब्यावर बसवून मजा घेत आहेत का ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

भविष्यात या पूर नियंत्रण रेषा धोक्याची पातळी आणखीनच ओलांडून नागरिकांची घरे उध्वस्त करू नये म्हणजे झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!