किकवी येथे शिव प्रहार प्रतिष्ठानतर्फे ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान


मंगेश पवार

भोर तालुक्यातील किकवी येथे सामाजिक, आरोग्य व पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शिव प्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. २८ मार्च २०२६ रोजी “समाजरत्न” पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. मंदार सुरेश माळी (बी.व्ही.जी. १०८ आपत्कालीन मेडिकल ऑफिसर, किकवी) यांना आरोग्य क्षेत्रातील ११ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. कोविड काळात तसेच प्रसूती, अर्धांगवायू, रोड अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी वेळेवर उपचार करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेत त्यांना “समाजरत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ADVERTISEMENT

तसेच रमाकांत वासुदेवराव मोरे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. त्यांच्या लेखणीतून समाजप्रबोधन, सत्य मांडण्याची निडर भूमिका आणि समाजाला दिशा देणारे कार्य सातत्याने होत आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. या सर्व योगदानाची दखल घेत त्यांनाही “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिव प्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

“सत्य मांडणे हा जर गुन्हा तर तो गुन्हा करू आम्ही पुन्हा, पुन्हा” हा संस्थेचा संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांनी सन्मानित मान्यवरांचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!