“निसर्ग, शिक्षण आणि समाजासाठी झटणारा — नसरापूरचा युवा नेता सुशील विठ्ठल विभुते”
मंगेश पवार
नसरापूर (ता. भोर) :समाजसेवा, शिक्षण आणि निसर्गसंवर्धन या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सुशील विठ्ठल विभुते हे भोर तालुक्यात आदर्श कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
ते पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे राज्यस्तरीय पदाधिकारी असून, हजाराहून अधिक तरुण कार्यकर्त्यांना निसर्गरक्षणासाठी प्रेरणा देतात.
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे, त्यांनी आजपर्यंत सर्व कामे स्वतःच्या खर्चातूनच केली आहेत — शाळांना संगणक भेट देणे, मोफत रंगकाम, झाडे लावणे, तसेच आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करणे अशा अनेक उपक्रमांमुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवून आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे —
> “राजकारण नव्हे, समाजकारण हेच सुशील विभुते यांचे खरे बळ आहे.”

 
			

 
					 
							 
							