लोणंद पोलीस ठाणे हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे/डॉल्बी तसेच लेझर लाईटचा वापर केल्यास गुन्हे दाखल होणार.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद पोलीस ठाणे येथे दिनांक 11/09/2024 रोजी झालेल्या मीटिंग दरम्यान लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील अनंत चतुर्दशी दिवशी निघणाऱ्या लोणंद शहरातील प्रमुख गणपती मंडळांची मीटिंग घेण्यात आली सदर मीटिंगमध्ये विसर्जन मिरवणुकीत डीजे/डॉल्बी तसेच इतर तस्यम इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीमचा व लेझर लाईटचा कोणीही मिरवणुकी दरम्यान वापर करणार नाही इत्यादी सूचना देण्यात आल्या असून मंडळाचे अध्यक्ष यांचेकडून डॉल्बी/डीजे तसेच लेझर लाईटचा वापर करणार नसले बाबत लेखी जबाब घेण्यात आला तसेच त्यांना बी.एन.एस.एस 168 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.मीटिंग करिता लोणंद नगरपंचायतीचे मा.मुख्याधिकारी सो,लोणंद श्री दत्तात्रेय गायकवाड तसेच लोणंद शहरातील प्रमुख मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. असे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सुशील भोसले यांनी कळविले आहे.


