न्हावी शाळेत लहान मुलांसोबत आज्जी आजोबा दिवस साजरा.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
सारोळे : जिल्हा परिषद प्राथ. शाळा न्हावी शाळेत आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला असून 100% विद्यार्थी आपल्या आजी आजोबांना शाळेत घेऊन आले होते.
तसेच ज्या आजी आजोबांचे पाल्य शाळेत नव्हते त्यांनीही शाळेत कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
यावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांनी आजी आजोबांचा कुटुंबातील महिमा व कुटुंबातील स्थान याबाबत महती सांगितली.
महादेव सोनवणे,गुलाब सोनवणे, संपत सोनवणे यांनी आपल्या मनोगतात कुटुंब,शाळा, समाज,यांच्या संस्कारातून,अध्यात्मातून विद्यार्थी कसा घडतो याचा जीवनप्रवास उलगडला.आजी आजोबांचे कुटुंबातील स्थान किती अढळ आहे ते सांगितले.
प्रत्येक विध्यार्थ्याने आजी आजोबांचे पूजन केले, पुष्पवृष्टी केली,कडकडून आलिंगन दिले, वंदन केले.यावेळी अनेक नातवंड आणि आजी आजोबा गहिवरले. उपस्थितांचा कंठ दाटून आला.तो क्षण अविस्मरणीय होता.नाते घट्ट करणारा होता.
जे अशिक्षित आजी आजोबा होते त्यांची नोंदणी करून त्यांना साक्षरता कार्यक्रमात जोडून त्यांना साक्षर करणेसाठी विद्यार्थी व शिक्षक प्रयत्न करणार आहेत.त्यासाठी आजी आजोबा यांना लवकरच वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.आजी आजोबा संगीत खुर्ची, चमचा लिंबू यांसारखे मनोरंजक खेळ तर खेळलेच पण गाण्याच्या तालावर सुद्धा नाचले.शिक्षक मुलांनी सुद्धा संधी सोडली नाही, मनसोक्त आनंद घेतला.
कार्यक्रमानंतर आजी आजोबा,विध्यार्थी,उपस्थित सर्वांना महेंद्र मोहन सोनवणे यांजकडून सर्वाना मोतीचूर लाडू,जिरा राईस,हरभरा-बटाटा भाजीचे स्नेहभोजन देणेत आले.
कार्यक्रमासाठी गणेश सोनवणे,भरत भोसले,दिपक सोनवणे,अविनाश भोसले,अनिकेत भोसले, प्रविण सोनवणे,गणेश सोनवणे आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नियोजन संदिप मोरे,अनिल चाचर, रुपाली पिसाळ,पूनम सोनवणे,सोनाली बोन्द्रे,उर्मिला भूतकर,, गीतांजली पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 
			

 
					 
							 
							