राजगड पोलिसांची आणि भारती विद्यापीठ पुणे पोलिसांची संयुक्त कामगिरी! अवघ्या ७२ तासात मोटरसायकलसह चोरास ठोकल्या बेड्या.


 

सारोळे : राजगड पोलीस स्टेशनच्या कापूरव्होळ गावच्या हद्दीतून दि. २०/७/२४ रोजी मोटरसायकल वाहनाची चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी अभय उत्तम बाठे यांनी दिली होती. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पोलीस नाईक मदने नाना यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय तांत्रिक कौशल्य पूर्ण तपास करत अवघ्या ७२तासाच्या आत चोरांना मोटर सायकल सहित बेड्या ठोकण्यात आल्या.

ADVERTISEMENT

 

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की, मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याप्रकरणी सदर वाहनाचा व आरोपीचा शोध सुरू असताना राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मदने नाना यांना मोटरसायकल ही गुजरवाडी कात्रज याठिकाणी असल्याची तांत्रिक विश्लेषणा नुसार माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलीसांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीसांशी सपर्क करून आरोपीस मोटार सायकल सह ताब्यात घेण्यास सांगितले त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडण्यासाठी आपले जाळे लावून ठेवले होते. आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या कारवाई मध्ये भारती विद्यापीठ कात्रज पुणे पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे.

 

सदर कामगिरी ही राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशन चे अंमलदारभारतीय विद्यापीठ यांचे पोलिसांनी केली आहे . पुढील अधिक तपास पोलीस नाईक नाना मदने हे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!