गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाई!वाई मध्ये दोन पिस्टल हस्तगत.
संपादक : मंगेश पवार
सातारा : बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक यांनी लोकसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील सपोनि सुधीर पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
परखंदी ता. वाई गांवचे हद्दीत एम.आय.डी.सी रस्त्यावरील चौकात दोन युवक पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता येणार आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी सुचना देवून वाई एम.आय.डी.सी परिसरात पेट्रोलींग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
दि.०३/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने वाई एम.आ.डी.सी. परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळाले बातमी मधील वर्णनाप्रमाणे एक युवक मिळाले बातमीचे ठिकाणाजवळ झाडाखाली त्याचे मोटारसायकलसह थांबलेला दिसला त्याचेकडे दुसरा युवक रस्त्याने चालत येताना दिसला दोन्ही युवक एकमेकांचे जवळ येवून बोलत असताना पथकास शंका आलेने त्यांना जागीच पकडून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे कब्जात २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५५०० रू. रोख रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण रू.२,५५,९००/- चा मुद्देमाल ताब्यात मिळून आलेने त्या दोन्ही युवकाविरुध्द वाई पोलीस ठाणेत शस्त्रबंदी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींची नावे
१) स्वप्नील उर्फ सोन्या प्रदिप जगताप वय २६ वर्षे रा. सुलतानपुर ता. वाई जि. सातारा.
२) गणेश कमल राठोड वय २५ वर्षे रा. सोनवडी ता. दौन्ड जि.पुणे
सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपोवेतो ८९ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर बंदूक, १ रायफल, १९९ जिवंत काडतुसे, व ३८५ रिकाम्या पंगळ्या, १ रिकामे मॅग्झीन असे जप्त करण्यात आलेले आहेत,
सदर कारवाई मध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोउनि, विश्वास शिंगाडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, राजू कांबळे, मनोज जाधव, पृथ्वीराज जाधव, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, पंकज बेसके, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले.


