तिर्थक्षेत्र सोळशी येथे शनी जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन! समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण.


खंडाळा प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र सोळशी ,ता कोरेगांव येथे येत्या ५ जुन,व ६ जुन २०२४ रोजी शनिजयंती निमित्ताने प.पू शिवयोगी मठाधिपती नंदगिरी महाराज ( शनी महाराज ) यांच्या कृपाशीर्वादाने व त्यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गेले कित्येक वर्षांपासून प.पू शिवयोगी मठाधिपती नंदगिरी महाराज ( शनी महाराज ) सोळशी हे तिर्थक्षेत्र सोळशी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यामध्ये सतत अग्रेसर असतात याच माध्यमातून येत्या शनी जयंती निमित्ताने शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन विविध कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे यामध्ये बुधवार ता ५ जुन २००२४ रोजी दुपारी १ / ३५ मिनिटांनी गोपूजन ,धर्म ध्वजा रोहन ,व सुस्राव्य भजनांचा कार्यक्रम,ष.ब्र.१०८ निळकंठ धारेश्वर शिवाचार्य महाराज धारेश्वर ता पाटण यांच्या उपस्थित वैशाख कृ ३० अमावस्या, गुरवार दिनांक ६ जुन २०२४ रोजी पहाटे ५/३० मिनिटांनी सूर्योदय पूजा सकाळी ८/३० वाजता ५२ पात्री लघुरुद्र अभिषेक सुरुवात दुपारी 12:30 वाजता पूर्णाहुती नवग्रह शांती, दुपारी१/३० वाजता महारथी व महाप्रसाद दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी उपस्थित जंग ब्राह्मण साधुसंत महंत योगी यांना महा अन्नदान व महा वस्त्रदान करण्यात येणार आहे

त्याच दिवशी शनी महात्म्य पारायण सोहळा सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार असून या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाचकांसाठी शनी महात्म्य ग्रंथ मोफत दिला जाणार आहे वाचकांसाठी नाष्टा भोजन पिण्याचे पाणी इत्यादी सोय केली जाणार आहे तसेच पारायण वाचनासाठी बसलेल्या वाचकांमधून सर्वोत्कृष्ट २५ वाचकांची परीक्षांमार्फत निवड करून त्यांना सुवर्ण अलंकार, ओवन, गोदरेज कपाट, वॉशिंग मशीन ,एअर कुलर, मिक्सर, पैठणी, इत्यादी असंख्य बक्षिसे व सन्मानपत्र दिली जाणार आहेत नियमित धार्मिक कार्यक्रम तसेच पहाटेपासून धार्मिक विधी व धार्मिक कार्यक्रम सुरू होवून दुपारी 2:30 वाजता परमपूज्य शिवयोगी त्यागेश्वर महाराज यांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे व सायंकाळी ५/३० वाजता मान्यवरांच्या हस्ते शनैश्वर कृतज्ञता धर्मरक्षा व इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच सूर्यास्तावेळी शनैश्वर जन्मोत्सव सोहळा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट यांनी केले आहे

ADVERTISEMENT

या शनी जयंतीला मा.प पु श्री १००८ महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती सेवागिरी महाराज संस्थान पुसेगाव, माननीय आमदार श्री प्रवीण दरेकर गटनेता विधानपरिषद अध्यक्ष मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुंबई, माननीय खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघ, माननीय आमदार श्री महेश शिंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कॅबिनेट मंत्री दर्जा कोरेगाव श्री गणपतराव आनंदराव पवार चेअरमन पुष्पक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई, श्री रामभाऊ लेंभें संस्थापक छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था पिंपोडे बु॥ यांच्या शुभहस्ते व यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे

यामध्ये शनैश्वर कृतज्ञता युवा धर्मरक्षा पुरस्कार ह भ प प्रवीण महाराज शेलार श्री शेत्र आंबेघर मेढा ता जावली, ऑ कॅप्टन नजीर शाहबुद्दीन शेख सोळशी ता कोरेगाव शनैश्वर कृतज्ञता भुमीपुत्र धर्म रक्षा पुरस्कार, श्री शैलेश कोथमीरे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना श्री शनैश्वर कृतज्ञता सहकार भूषण धर्म रक्षा पुरस्कार, तसेच नंदकुमार सदाशिव येळे सहाय्यक संचालक आयुद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य महाराष्ट्र राज्य औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय रत्नागिरी यांना शनेश्वर कृतज्ञता आदर्श प्रशासक सेवा धर्म रक्षा पुरस्कार सौ मंदाताई लालासाहेब करांडे माजी सभापती शाळा गाव ता कडेगाव जिल्हा सांगली यांना श्री शनिश्वर कृतज्ञता सामाजिक विकास धर्म रक्षा पुरस्कार यांना देण्यात येणार आहेत. तरी या सर्व दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन प.पू शिवयोगी मठाधिपती नंदगिरी महाराज ( शनी महाराज ) व तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट सोळशी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!