जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सारोळे माध्यमिक विद्यालयातील सार्थक धाडवे यांची राज्यस्तरावर निवड.
सारोळे प्रतिनिधी :
नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय फुलगाव तालुका हवेली येथे शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड दि 12/4/24 रोजी ते 14/4/24 या कालावधीमध्ये झाला.

ADVERTISEMENT
या प्रदर्शनामध्ये मध्ये May I Help You Device हे उपकरण सादर करण्यात आले होते. यामध्ये दिनकरराव धाडवे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थी सार्थक नितीन धाडवे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
या प्रदर्शनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम एस ताकवले तसेच संस्थेचे चेअरमन प्रमोद गुजर, सचिव प्रकाश गौर, संस्थेचे इतर पदाधिकारी, विद्यालयातील सहकारी शिक्षक या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


