पत्रकार क्षेत्रातील धारदार लेखणीचे शिलेदार वैभव धाडवे यांचा वाढदिवस विशेष.


 

पुण्यभूमी न्यूज नेटवर्क

सारोळे  : सामाजिकतेचे भान आणि कर्तव्याची जाण यांचा मेळ घालून आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी धडपडणारे पत्रकार क्षेत्रातील लेखणीचे शिलेदार मा. वैभव राजे धाडवे यांचा आज वाढदिवस विशेष अंक.

 

भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावर असणाऱ्या सारोळे गावातील शेतकरी कुटुंबात वैभव धाडवेंचा जन्म झाला.

 

त्यांनी जिल्हा परिषद शाळा सारोळे येथून घेतलेल्या शिक्षणातून पुढे महाविद्यालयातील पदवी घेऊन त्यांनी स्वतः व्यवसाय करण्याची आवड असल्याने विविध व्यवसाय केले.

त्यामध्ये त्यांनी केबल, आईस्क्रीम कंपनी, हॉटेल व्यवसाय अशा विविध व्यवसाय केले.

ते करत असताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय हिताची कामे केली.

सारोळे गावातील दोन पंचवार्षिक ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सरपंच आणि सदस्य बॉडी निवडून आणली. वैभव धाडवे आणि ग्रामपंचायत सरपंच मा. संभाजी घारे आणि सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी उपोषण करून नामांकित कंपनीमध्ये १५ तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला.

तसेच त्यांनी शूरवीर मावळी संघटने च्या माध्यमातून तरुणांना रोजगार मेळावा घेतला.  त्यासाठी जिजाऊ मातेचे वंशज प्राचार्य नामदेवराव जाधव, भोर तहसीलदार, प्रांत यांनी रोजगार मेळावा मध्ये बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेतले.

ADVERTISEMENT

 

वैभव धाडवे हे एक निर्भीड, डॅशिंग पत्रकार असून ते सतत अन्यायाचे विरोधात आवाज उठवण्याचे काम सातत्याने करत आहेत. भोर तालुक्यात त्यांची दीर्घ सेवा प्रामाणिक सेवा बजावत अनेकांशी मैत्रीचे नाते जोडले आहे. त्यामुळे त्यांचे भोर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात नावलौकिक आहे. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वरून शुभेच्छा वर्षाव होत आहे. साधी रहाणी उच्च जनहीताची विचारसरणी आणि कृतिशील कार्य मनमिळावु स्वभाव या गुणांमुळे युवा पत्रकार वैभव धाडवे यांची पुणे जिल्ह्यात ख्याती आहे. साधे व्यक्तिमत्व असताना त्यांची लेखणी मात्र निर्भीड धारदार आणि आगळीवेगळी लक्षवेधी आहे. त्यांच्या लेखणीचा अनेक जण धसका घेत असताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व उपेक्षित घटनांवर निर्भीडपणे लिखाण करीत असल्यामुळे भोर तालुक्यात यांचा मोठ्या प्रमाणात वाचक वर्गासह चाहत्यांचीही कमी नाही.

पत्रकार वैभव हे आमच्या गावातील आहेत हेच फार मोठे भाग्य आहे. त्यांच्या लेखणीचा अनेकजण चांगलाच धसका घेतात कारण त्यांच्या लेखणीची धार तलवारीच्या धारेपेक्षा अधिक आहे. त्यांच्या लेखणीतून समाजातील अनेक उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.  रमेश धाडवे वकील संघटना भोर

 

मनमिळाऊ हसतमुख अडचणी समयी धावून जाणारे तसेच आपल्या लेखणीतून अन्यायला आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना घाम फोडणारे आमचे हितचिंतक मार्गदर्शक निर्भीड युवा पत्रकार वैभव आपल्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांचा व लोकशाहीचा आवाज बुलंद होत राहो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना.  योगेश जाधव,  पत्रकार पुणे वैभव  महाराष्ट्र पत्रकार संघ भोर तालुका अध्यक्ष

 

पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असताना कुणालाही न घाबरता दबावाला न पडता कुणाच्याही होणाऱ्या परिणामाला सामोर जाण्याचे ताकद ठेवतात. आज पर्यंत त्यांनी चांगले चांगले लोकांना जेरीस आणले असून त्यांचा नाद कोणी करत नाही.सर्व राजकीय पक्ष, नेते यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असून सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी देखील त्यांचे संबंध चांगले आहेत.  राजेंद्र वाघमारे कापूरहोळ पत्रकार, संपादक स्वराज न्यूज

शब्दांकन: मुख्य संपादक मंगेश पवार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!